टीईटी परीक्षेबाबत शिक्षण मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा ! ऑनलाईन..
टीईटी परीक्षेबाबत शिक्षण मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा ! ऑनलाईन..
img
Nandini khandare More

नीट परीक्षेचा पेपर फुल्यानंतर देशभरात मोठा गदारोळ निर्माण झाला होता दरम्यान हि परीक्षा रद्द करून नीट ची पुर्नपरीक्षा घेण्यात आली. दरम्यान आता 
नंतर टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या टीईटी परीक्षेबाबत शिक्षण मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा  केली असल्याची अपडेट समोर आली आहे. 

 टीईटी परीक्षा 28 जूनलाहोणार होती, मात्र 27 तारखेली पेपरफुटीची माहिती समोर आल्याने परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता टीईटी परीक्षेची नवीन तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आगामी काळात असे प्रकार रोखण्यासाठी आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने तयारी सुरू केली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत विधानसभेत माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणावर आज विधिमंडळात चर्चा झाली, यावेळी बोलताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटले की,टीईटी पेपर फुटीबाबत माहिती मिळतात, पेपर विक्री करण्सासाठी येणाऱ्या तिघांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे टीईटीचे पेपर आढळले. ⁠राजू प्रयाग शाम आणि आणखी दोघांवर भिवंडी कोनगाव येथे गुन्हा दाखल केला आहे.

पुढे बोलताना मंत्री भुसे यांनी सांगितले की, ⁠मोठी रक्कम घेऊन हे पेपर विक्री करणार होते. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना 27 तारखेला अटक केली आहे. पोलिस आयुक्त गुन्हे ठाणे यांची एसआयटी स्थापन केली आहे. हरियाणा, बिहार आणि दिल्लीला तपासासाठी पथके रवाना झाले आहे. या प्रकरणात मकोका लावण्याच्या संदर्भात तपासणी सुरु आहे. आता फेर पेपरसाठी कोणताही शुल्क घेतल जाणार नाही. पुढील परीक्षा पारदर्शक आणि ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी या प्रकरणालर बोलताना म्हटले की, टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात का छापल्या जात आहेत? ⁠जर विश्वास ठेवून नाशिकमध्ये नोटा छापल्या जात असतील तर प्रश्नपत्रिका आग्र्यात का छापल्या जातात? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना परीक्षा पारदर्शकपणे होण्याकरता समिती नेमली जात आहे. इथून पुढे परीक्षा प्रक्रिया आणि पेपर हा ऑनलाईन पद्धतीने घेतला जाईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group