संपूर्ण जून महिना कोरडा ठाण गेला असून जून महिन्यात पावसाने धास्तीच भरवली होती. जून महिन्यातील पावसाचे प्रमाण बघता पाण्याच्या दुष्काळाची प्रचिती जणू नागरिकांना येऊ लागली होती. परंतु आता मात्र जुलै महिना सुरु होताच पावसाने आपलेमात्र जबरदस्त एंट्री केली आहे.
राज्यात धो धो पाऊस सर्वत्र आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. रात्रभर सतत पाऊस सुरू होता. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. मुंबईमध्ये चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला. आज रायगड आणि पुण्यात रेड अलर्ट हवामान विभागाने दिला. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. यादरम्यानच पुणे हवामान विभागाचे प्रमुख एस. डी. सानप यांनी महत्वाची माहिती दिलीये. राज्यातील घाटमाथ्यावर येत्या चार दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला. जूनमधील कमी झालेल्या पावसाची पोकळी येत्या चार दिवसात भरून निघेल, असे मोठे विधान एस. डी. सानप यांनी केले.
राज्यात मान्सून मौसमी पाऊस सक्रिय झाल्याचे चित्र पाहावयास मिळतंय. राज्यातील घाटमाथ्यावर येत्या चार दिवस रेड अलर्ट देण्यात आला. जूनमधील कमी झालेल्या पावसाची पोकळी येत्या चार दिवसात भरून निघणार असल्याची माहिती भारतीय हवामान पुणे विभागाचे प्रमुख एस. डी. सानप यांनी दिलीय. पुढील 4 दिवसात पावसाचा वेग वाढणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली.
हवामान विभागाकडून आज नागपूरसह विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टीचा येलो अलर्ट देण्यात आला. सध्या नागपूरसह परिसरात रिमझिम पाऊस आणि ढगाळ हवामान आहे. रिमझिम वावसामुळे खरिप पेरणीला येणार गती मिळतंय. गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे तापमानात मोठी घट झाली. विदर्भातील धरणांमध्ये पाणीपातळी वाढण्यासंही मदत होतंय. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी पेरणी केली त्यांच्या पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. किनारपट्टी भागाला तीन नंबरचा बावटा अरबी समुद्रात ताशी 40 किलोमिटर वेगाने वारे खाडी किनारी किंवा समुद्रकिनारी मच्छिमारी करू नये, मत्स्यविभागाचे आवाहन केले. 5 जुलैपर्यत जिल्ह्यात कोसळधारा दुपारनंतर समुद्राला उधाण, साडेचार मिटरच्या लाटा आज देखिल समुद्र खवळलेला, किनारपट्टी भागालील लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.