उद्धव ठाकरेंना  पुन्हा मोठा धक्का बसणार ? विश्वासू नेत्यासह पदाधिकारी.... नेमकं काय घडतंय ?
उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसणार ? विश्वासू नेत्यासह पदाधिकारी.... नेमकं काय घडतंय ?
img
Nandini khandare More
सध्या राजकारणात मोठी उलटफेर सुरु असून पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात आणखी मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची चर्चा रंगली आहे. आधी 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्यानंतर आता ठाकरे गटातील आणखी काही नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत.

विधान परिषदेच्या उपसभापती निवडणुकीसाठी सचिन अहिर यांचा अर्ज महायुतीकडून दाखल करण्यात आला. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, विधान परिषदेतील आमदार सुनील शिंदे आणि काही नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही इतर आमदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group