सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असून आता ठाकरे गटाला लागलेली ही गळती रोखण्याचं उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान या सर्व घडामोडी घडत असतानाच आता मंत्री संजय शिरसाट यांनी ऑपरेशन टायगर 3.0 बद्दल मोठं विधान केलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
मंत्री संजय शिरसाट यांनी ऑपरेशन 3.0 बाबत मोठं विधान केलं आहे. आमचे ऑपरेशन 3.0 सुरू झालं आहे. आता महाभूकंप होणार आहे. तो कधी होणार हे एकनाथ शिंदे ठरवतील असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. संजय शिरसाट यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेना ठाकरे गटातून सहा खासदार फुटण्यापूर्वी देखील ते सातत्याने ऑपरेशन टायगरबद्दल बोलत होते, आणि त्यानंतर सहा आमदारांनी पक्षातून बंडखोरी केल्याचं पहायला मिळालं.