दक्षिण युरोप मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तीव्र उष्णतेच्या लाटेत स्पेनच्या अल्मेरिया जंगलात वणवा भडकला आहे. दक्षिण युरोपमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे भीषण वनवणवा उसळला असून, स्पेनच्या अल्मेरिया प्रांतातील जंगलाला लागलेल्या आगीने मोठे नुकसान झाले आहे. या भीषण आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली असून, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
वणवा भडकल्यानंतर या आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. तर आतापर्यंत घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण भागातील अल्मेरियाच्या लॉस गैलार्डोसमधील जंगलाला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच 150 हून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आपत्कालनी मंत्री एंटानियो सैन्ज यांनी ही आग विनाशकारी असल्याचे म्हटलं आहे
लॉस गैलार्डोस स्पेनच्या आंदालूसियामध्ये अल्मेरिया प्रांताची एक नगरपालिका आहे. या प्रांतातील एका गावात असलेल्या जंगलाला (Forest) भीषण आग लागली. सध्या या भागात तापमान 40 डिग्री सेल्सिअसहून अधिक आहे. वीजेची तार तुटल्याने आग लागल्याचा संशय आहे. त्यात जंगलात उन्हाने वाळलेली पाने अधिक असल्याने आग सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. याआधी दक्षिण फ्रान्समध्ये आठवड्याच्या सुरुवातीला एका जंगलाची सर्वत्र पसरली होती.
या भीषण आगीत 12 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही जणांचे मृतदेह हे वाहनात आढळले आहेत. स्पेनच्या सीमेवर 24 हून अधिक गावे आहेत. या सर्व गावांत जवळपास 10000 हून अधिक जण राहतात. या आगीच्या घटनेनंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. आगीमुळे अनेक मार्ग देखील बंद झाले आहे. आगीच्या धुरामुळे लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. त्यामुळे बहुतांश जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
स्पेनमध्ये भीषण उष्णतेची लाट
स्पेनमध्ये ही 1950 सालानंतरची सर्वात भीषण उष्णतेची लाट मानली जात आहे. या तापमानाने उच्चांक गाठला आहे. काही भागांमध्ये 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या उष्णतेमुळे जमिनीचा मोठा भाग कोरडा पडल्याचेही माहिती मिळतेय. गेल्या वर्षी स्पेनमध्ये 9 लाख 71 हजार एकर जमीनीवरील (Land) झाडे जळून खाक झाले होते. या वर्षी लागलेल्या आगीने ग्रामस्थांचं टेन्शन वाढलं आहे. अनेक जण सरकार आणि प्रशासनाकडे मदतीची याचना करत आहेत.