खळबळजनक ! प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न ; नेमकं काय घडलं?
खळबळजनक ! प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न ; नेमकं काय घडलं?
img
Nandini khandare More
अलीकडे आत्महत्येसारख्या गंभीर घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून आता एका प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 

प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी उदय कृष्ण रेड्डी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी हैदराबादमध्ये घडली आहे. या घटनेनंतर रविवारी सायंकाळी एर्रागड्डा येथील जयंत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. परंतु या घटनेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, उदय कृष्ण रेड्डी हे रविवारी सायंकाळी मोती नगर भागात एका मित्राच्या घरी गेले होते. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यांनी मित्राच्या घरी विष प्यायल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय पोलीस अकादमीचे अधिकारी जयंत रुग्णालयात भेटीला पोहोचले आहेत. त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेऊन रेड्डी यांच्या तब्येतीची माहिती जाणून घेतली आहे. याबाबत अद्याप राष्ट्रीय पोलीस अकादमीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

तत्पूर्वी, पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांकडून सर्व बाबींचा तपास केला जात आहेच. आता पोलिसांकडून वैद्यकीय अहवाल आणि पुराव्याच्या आधारावर पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यांनी खरंच विष प्यायला होतं का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता पोलीस आणि राष्ट्रीय पोलीस अकादमीकडून लवकरच अधिकृत भाष्य केलं जाईल, त्यानंतर या प्रकरणाची वस्तूस्थिती समोर येईल.

नेमकं काय घडलं?

एका महिला ट्रेनी आयपीएस (IPS) अधिकाऱ्याने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी कोणत्याही परवानगीशिवाय प्रायव्हेट व्हिडिओ केल्याचाही गंभीर आरोप केला आहे. परंतु उदय कृष्ण रेड्डी यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. रिपोर्टनुसार, गंभीर आरोपानंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group