आंदोलन मोडून काढले ! CJP कार्यकर्त्यांवर लाठीमार, जंतर-मंतर रिकामे
आंदोलन मोडून काढले ! CJP कार्यकर्त्यांवर लाठीमार, जंतर-मंतर रिकामे
img
Nandini khandare More

दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन चांगलेच भडकले आहे. दरम्यान  काल रात्रीपासूनच दिल्लीच्या जंतरमंतर स्थळावर आंदोलकांनी डेरा असून आता पोलिसांनी आंदोलन लाठीमार आणि बळाचा वापरत करीत हे आंदोलन मोडून काढले असून जंतर-मंतर रिकामे केले आहे. 

दिल्ली पोलिसांनी कॉक्रोज जनता पार्टीने संसदेकडे कूच केल्यानंतर हे आंदोलन लाठीमार आणि बळाचा वापरत करीत मोडून काढले. जंतर मंतर येथील सर्व  CJP निदर्शकांनी चलो संसद असा नारा देत संसदेकडे कूच केल्याने दिल्ली पोलिसांनी जोरदार लाठीमार करीत हे आंदोलन मोडून काढले आहे. 

मात्र, सकाळी भाजपाचे मंत्री जे.पी.नड्डा स्वत: आंदोलकाच्या शिष्टमंडळाशी बोलणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर कॉक्रोज जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी अडीच दिवसांचे उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतरही अचानक आंदोलकांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून हे आंदोलन मोडून काढले. जंतरमंतर येथेही लाठीमार करुन सर्व आंदोलनावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन ते रिकामे करण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group