CJP आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज प्रकरण याचिकेवर सुनावणी ! हाय कोर्टातून मोठा आदेश
CJP आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज प्रकरण याचिकेवर सुनावणी ! हाय कोर्टातून मोठा आदेश
img
Nandini khandare More

नीट पेपर घोटाळा प्रकरणावरून सध्या देशभरात गदारोळ सुरु असून शिक्षणं मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीने 20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढला होता. 

दरम्यान यावेळी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा करण्यात आला, तसेच लाठीचार्ज देखील करण्यात आला, या घटनेत अनेक आंदोलक विद्यार्थी जखमी झाले. त्यापूर्वी जंतर -मंतरवरून आमरण उपोषणासाठी बसलेल्या सोनम वांगचूक यांना हटवण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि सोनम वांगचूक यांच्या मुद्द्यावर दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर चीफ जस्टिस देवेंद्र उपाध्याय आणि जस्टिस तेजस कारिया यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावर आता हाय कोर्टाकडून मोठा आदेश देण्यात आला आहे.

या प्रकरणात दिल्ली हाय कोर्टाकडून दिल्ली पोलिसांना नोटीस जारी करण्यात आली आहे. चार आठवड्याच्या आत उत्तर द्यावं असं न्यायालयाने या नोटीसमध्ये म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर पुढील चार आवड्यानंतर पोलिसांच्या उत्तरावर याचिकाकर्त्यांकडून प्रत्युत्तर दाखल करण्यात येणार आहे.दरम्यान पोलिसांनी कॅमेरा आणि सीसीटीव्ही फुटेज जतन करावं असा आदेश देखील हाय कोर्टाकडून पोलिसांना देण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group