राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्या लग्नाबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्येही उत्सुकता होती. आता विवाहाची तारीख जाहीर झाल्याने पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पवार कुटुंबात यापूर्वीही अनेक मोठे कौटुंबिक सोहळे पार पडले आहेत. आता पार्थ पवार यांच्या विवाहानिमित्त पुन्हा एकदा कुटुंबात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.
पार्थ अजित पवार यांच्या विवाहाची तारीख अखेर समोर आली आहे. पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाह निश्चित झाला असून, येत्या 29 जुलै रोजी त्यांचा साखरपुडा पार पडणार असल्याची माहिती आहे.
साखरपुड्यानंतर पुढील वर्षी 27 फेब्रुवारी 2027 रोजी पार्थ पवार आणि कायनात दारा विवाहबंधनात अडकणार आहेत. या विवाहसोहळ्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी दिली आहे.. पार्थ पवार -कायनात याच्या लग्नाबद्दल अनेकांना उत्सुकता होती, आता त्यांच्या विवाहाची तारीख समोर आल्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या विवाहासंदर्भात काही धार्मिक शंकांचे निरसन करण्यासाठी आणि विधींबाबत माहिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी करवीर पीठाचे शंकराचार्य यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पार्थ पवार व कायनात यांच्या विवाहाची तारीख व स्थळ याबाबतची अधिकृत माहितीही जाहीर केली. येत्या 29 जुलै रोजी, अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईकांच्या व फक्त निमंत्रित यांच्या उपस्थितीत पार्थ व कायनात यांचा साखरपुडा समारंभ पार पडणार आहे. तर पुढल्या वर्षी, 27 फेब्रुवारीला बारामती येथे दोघांचा विवाह होईल, असं पाटील यांनी सांगितलं.