नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; रामकुंड परिसरात तरुणाची थरारक सुटका
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; रामकुंड परिसरात तरुणाची थरारक सुटका
img
Nandini khandare More
अनेक दिवसांपासून उसंत घेतलेल्या मेघराजाने आता जोरदार कमबॅक करण्यास सुरुवात केली आहे. राज्यासह नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान काल पासून नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे. जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. रात्रीतूनच पाण्याचा प्रवाह आणि पाणी पातळी वाढल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. रामकुंड परिसरात पूरस्थितीमुळे नेपाळचे दोन पर्यटक अडकले. 

रामकुंड परिसरातील गांधी ज्योतच्या खाली हे तरूण अडकले होते. रात्री गांधी ज्योतच्या वर हे पर्यटक थांबले होते. रात्री पाण्याची पातळी वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. सकाळी गोदावरीला पूर आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी आवाहन केले. या ठिकाणच्या एका तरुणाला बाहेर काढण्यात यश आले आहे. 

सकाळी काही तरुणांनी रेस्क्यू टीमला ही बाब कळवली. त्यानंतर या तरुणासह नेपाळच्या पर्यटकाला पाण्याच्या  वाढलेल्या प्रवाहातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अग्निशमन दल आणि जीव रक्षक दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. त्यासाठी लाईफ जॅकेटसह टायर आणि दोरीचा वापर करण्यात आला. या आयुधासह रेस्क्यू ऑपेरशन राबवण्यात आले. 

अग्निशमन दल आणि जीव रक्षक दलाने गांधी ज्योतपर्यंत दोरखंड बांधला. त्यामाध्यमातून तरूणासह पर्यटकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाण्याचा प्रवाह पाहता दोघांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपेरशन राबवण्यात आले. हा थरार पाहण्यासाठी लोकांनी गोदाकाठावर गर्दी केली होती. तर पर्यटकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती. 

रामकुंड परिसरात अडकलेल्या तरुणाला जवानांनी बाहेर काढले.  गोदावरीत अचानक पाणी वाढल्याने हा तरुण आणि पर्यटक अडकला होता. गांधी ज्योत च्या खाली हा तरुण अडकला होता.  अग्निशमन दल आणि जीव रक्षक दलाच्या जवानांनी तरुणाला बाहेर  काढले. संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरीला पूर आला आहे. 

रामकुंड परिसरात अडकलेल्या तरुणाला जवानांनी बाहेर काढले. गोदावरीत अचानक पाणी वाढल्याने हा तरुण आणि पर्यटक अडकला होता. गांधी ज्योत च्या 
तर यापूर्वी एका नेपाळच्या पर्यटकाला  अग्निशमन दल आणि जीव रक्षक दलाच्या जवानांनी बाहेर काढले होते. गोदावरीला पूर आल्याने पर्यटकांसह नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group