परजातीतील प्रेमप्रकरणाला कडाडून विरोध ; पळून जाण्याची धमकी देणाऱ्या मुलीचा आईनेच आवळला गळा
परजातीतील प्रेमप्रकरणाला कडाडून विरोध ; पळून जाण्याची धमकी देणाऱ्या मुलीचा आईनेच आवळला गळा
img
Nandini khandare More
गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून आता एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीचे प्रेमप्रकरण मान्य नसल्याने एका आईनेच आपल्या मुलीची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

 शेजारीच राहणाऱ्या परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने संतप्त झालेल्या आईने आपल्या पोटच्या मुलीची स्कार्पने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीचे रात्री दीड वाजता तिच्या आईसोबत भांडण झाले होते. त्यानंतर या मुलीने पळून जाण्याचा बेत सांगितल्याने संतापलेल्या आईने तिच्याच स्कार्पने या मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर या मुलीच्या वडीलांनी स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या घटनाक्रम स्वत:च पोलिसांना सांगितला.

अमृता गरुड या १९ वर्षीय तरुणीचे ती राहत असलेल्या उल्हासनगरच्या परिसरात राहणाऱ्या एका परजातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांना तिची आई आशा गरुड हीने विरोध केला होता. याच कारणावरून रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अमृता आणि तिच्या आईचे भांडण झाले. वादानंतर अमृता हीने आपण आता घर सोडून जाणार असे आईला सांगितले. त्यानंतर आईने रागाच्या भरात स्कार्पने आपल्या पोटच्या मुलीचा गळा आवळून तिचा खून केला. या घटनेनंतर अमृता हीच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आशा गरुड हीला अटक केली.

अमृता हीचे शेजारीच राहणाऱ्या एका परजातीतील तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या घरच्यांचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. रात्री दीड वाजता अमृता हीचे आईशी कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर अमृता हीने आपण पळून जाऊ असे म्हटल्याने आईने तिचा रागाच्या भरात स्कार्पने गळा आवळला. त्यानंतर तिच्या वडीलांनी पोलिस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार सांगितल्याचे उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी सांगितले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group