धक्कादायक ! 20 वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षिकेचा जीव जडला; पतीची आत्महत्या
धक्कादायक ! 20 वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षिकेचा जीव जडला; पतीची आत्महत्या
img
Nandini khandare More

गुरु आणि शिष्याचं नातं हे पवित्र मानलं जात आईवडिलांनंतर जर कोणतं नातं श्रेष्ठ असेल तर ते गुरु आणि शिष्याचं असत. परंतु याच पवित्र नात्याला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. 

पंजाब येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला शिक्षिकेचे तिच्या २० वर्षीय विद्यार्थ्यांसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. ही बाब समजल्यानंतर तिच्या पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांनी महिला शिक्षिकेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र तिने नवऱ्यासोबत घटस्फोट घेईल पण विध्यार्थ्याला सोडणार नाही. महिला या होणाऱ्या प्रयत्नांमुळे संतापली आणि ती आपल्या मुलीला घेऊन माहेरी गेली. यांनतर तिच्या पतीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घडलेली घटना चंदीगड येथील आहे.

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मोनू असे आहे. तो आपल्या पत्नीसोबत मौलीजागरण येथील मौली कॉम्प्लेक्समध्ये राहत होता. मोनूचं लग्न आठ वर्षांपूर्वी कोमलशी झाला. या दांपत्याला सहा वर्षांची एक मुलगी आहे.त्याची पत्नी कोमल घरी शिकवणी घ्यायची. अनेक विध्यार्थी तिच्याकडे शिकवायला येत असत.

सात आठवड्यांपूर्वी कुटुंबाला समजले की कोमलचे एका 20 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध आहेत. सनी नावाचा तो विद्यार्थी शिकवणीसाठी त्यांच्या घरी यायचा. जेव्हा हे दोघे एकटे असत, तेव्हा त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कुटुंबाने कोमलला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने नकार दिला आणि सांगितले की पतीला घटस्फोट द्यावा लागला तरीही ती विद्यार्थ्यासोबतचे संबंध तोडणार नाही. या वारंवार समजावल्यामुळे पत्नीला राग आला. ती आठवडाभरापूर्वी आपल्या सहा वर्षांच्या मुलीसह आणि सर्व सामान घेऊन माहेरी निघून गेली. ही बाब मोनूला कळताच तो मानसिक तणावाखाली गेला. तो कुटुंबीयांसमोर रडत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनतर मोनूने टोकाचे पाऊल उचलले.

कशी उघडकीस आली घटना?

मोनूचा धाकटा भाऊ, कपिल, 22 जुलै रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी परतला. तो घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेला आणि त्याला त्याचा मोठा भाऊ मोनू छताच्या पंख्याला लटकलेला आढळला. त्याने तात्काळ आरडाओरडा केला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने पंचकुला येथील सेक्टर 6 मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गुन्हा दाखल

मोनूच्या भाऊ कपिल याच्या तक्रारीवरून पत्नी कोमल आणि तिचा प्रियकर सनी यांच्याविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, तक्रारीत आरोप आणि पुराव्यांची चौकशी सुरु आहे. तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group