मोठी अपडेट ! आज रात्री 8 वाजता शिक्षण मंत्रालय करणार सर्वात मोठी घोषणा
मोठी अपडेट ! आज रात्री 8 वाजता शिक्षण मंत्रालय करणार सर्वात मोठी घोषणा
img
Nandini khandare More

नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे सध्या देशभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक झाली असून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजूमामा द्यावा यासाठी मोठं आंदोलन सुरु केलेलं आहे. दरम्यान या आंदोलनावरून मोठा गदारोळ सुरु आहे. 

राष्ट्रीय टेस्टिंग एजेन्सी (NTA) च्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून आज रात्री आठ वाजता एक मोठी घोषण करण्यात येणार आहे.

एका वृत्तानुसार  शिक्षण मंत्रालयाकडून NTA मधील सुधारणांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय आणि नवीन प्रणाली जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. परीक्षेमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षा यांची जबाबदारी निश्चित करण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल असणार आहे, असं बोललं जात आहे. मात्र अद्याप यासंदर्भातील मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

इतर बातम्या
Join Whatsapp Group