आता FDA कडून थेट हायकोर्टाच्या कँटीनला बंद करण्याची नोटीस
आता FDA कडून थेट हायकोर्टाच्या कँटीनला बंद करण्याची नोटीस
img
Nandini khandare More
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून तुकाराम मुंढे यांच्याकडून कारवाईचा धडाका सुरु असून एफडीएकडून महाराष्ट्रात नामांकित हॉटेलवर कारवाईचा धडाका सुरू असून आता अन्न व औषध प्रशासनाचा मोर्चा सरकारी आस्थापनाकडे वळला आहे. हायकोर्टाने मंत्रालायाच्या कँटीनची पुन्हा तापसणी करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाच्या नोटीसने  थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कँटीनला टाळ ठोकण्याची वेळ आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून कँटीनवर कारवाई केल्याने वकील वर्गात एकच खळबळ उडाली.

अन्न व औषध प्रशासनाकडून मागील काही दिवसांपासून खासगी आस्थापनावर कारवाईचा धडाका सुरू होता. त्यावरून एका सुनावणी दम्यान सरकारी आस्थापनावरील कँटीनबाबत विचारणा केली होती. त्यानंतर एफडीएच्या पथकाने हायकोर्टाच्या कँटीनला भेट दिली. त्यानंतर आज अन्न व औषध प्रशासनाने हायकोर्टाचे कँटीन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. हायकोर्टातील कँटीन हे एफएसएसआय परवान्याशिवाय चालवले जात होते. त्यामुळे नियमांचे पालन करत नसल्याचे म्हणत अन्न व औषध प्रशासनाने कँटीन चालकाला व्यवसाय थांबवण्याचे आदेश दिले. अन्न व औषध प्रशासनाने कोर्टाच्या आवारातील 3 कँटीनला नोटीस दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group