गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असून सध्या हत्येसारखे गंभीर गुन्हे देखील सर्रासपणे घडत आहेत. दरम्यान बीड शहरातही गुंजेगारीने डोके वर काढले असून एक धक्कदायक बातमी आता समोर येत आहे.
गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे गेवराई तालुक्यातील नागझरी गावचे सरपंच नारायण शिंदे यांच्यावर वाळू माफियांनी घरात घुसून जीवघेणा हल्ला केला.
अवैध वाळू उपशाला विरोध करून सतत आवाज उठवणाऱ्या सरपंचावर वाळू माफियांनी घरात घुसून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या हल्ल्यानंतरही आरोपींना अटक न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 1 तास रास्ता रोको करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
नागझरी गावाचे सरपंच नारायण शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील अवैध वाळू उपशाविरोधात सातत्याने तक्रारी करत होते. या तक्रारींमुळे चिडलेल्या वाळू माफियांनी सरपंच शिंदे यांच्या घरी घुसून त्यांच्यावर हल्ला केला. संतोष देशमुखांसारखाच तुझा मर्डर करू, अशी धमकी देत हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करूनही पोलिसांना अद्याप आरोपींना अटक करता आलेली नाही, यामुळे गावकरी संतापले होते. आरोपींना तात्काळ अटक करावी आणि वाळू माफियांची मुजोरी कायमची थांबवावी, या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. परिणामी दोन्ही बाजूंना सुमारे 3 किमीपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी घटना समोर आली आहे. गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे गेवराई तालुक्यातील नागझरी गावचे सरपंच नारायण शिंदे यांच्यावर वाळू माफियांनी घरात घुसून जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल एक तास 'रास्ता रोको' आंदोलन केले.
नागझरी गावाच्या हद्दीत गोदावरी नदीपात्रातून गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याने आणि गावकऱ्यांच्या तक्रारींमुळे सरपंच नारायण शिंदे हे वाळू माफियांच्या विरोधात सातत्याने प्रशासनाकडे तक्रारी करत होते, तसेच जाहीर विरोधही दर्शवत होते. याच तक्रारींचा राग मनात धरून वाळू माफियांनी थेट सरपंच शिंदे यांचे घर गाठले. घरात घुसून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. संतोष देशमुखांसारखाच तुझा मर्डर करू, अशी उघड धमकी देत हा हल्ला करण्यात आला. या संपूर्ण जीवघेण्या हल्ल्याचे थरारक दृश्य परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाले आहे.