तुकाराम मुंढेंचा  दरारा ! कारवाईचा मोठा धसका; छापा टाकण्याआधीच असं काही घडलं...
तुकाराम मुंढेंचा दरारा ! कारवाईचा मोठा धसका; छापा टाकण्याआधीच असं काही घडलं...
img
Nandini khandare More
गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध विभागाच्या कारवाईचा धडाका सुरु असून तुकाराम मुंढे यांच्या पथकाकडून शहरात विविध ठिकाणी तपासणी मोहीम सुरू आहे. दरम्यान तुकाराम मुंढे यांचा बेधडक व्यक्तिमत्त्वाशी सर्वच जण प्रचलित आहेत. त्यामुळे त्यांचा दरारा देखील तसाच आहे. याचाच प्रत्यय येणारी एक घटना अकोल्यात पाहायला मिळाली आहे. 

अकोल्यात अन्न व औषध विभागाच्या कारवाईचा मोठा धसका दुकानदारांनी घेतल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तुकाराम मुंढे यांच्या पथकाकडून शहरात विविध ठिकाणी तपासणी मोहीम सुरू असतानाच अकोला ते अकोट रस्त्यावरील पळसोद फाट्याजवळ हजारो पेप्सी म्हणजेच कुल्पी प्रकार रस्त्यालगत फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात दुकानदारांनी भीतीपोटी हा माल टाकून दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फेकण्यात आलेल्या पेप्सी भेसळयुक्त असू शकतात, अशीही चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अकोल्यातील चौहट्टा बाजार परिसरात अन्न व औषध विभागाच्या पथकाकडून धाडी टाकण्यात येत आहेत. अनेक दूध डेअरी आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी सुरू असून संशयित पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे अकोल्यातील अनेक दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group