मोठी बातमी ! राष्ट्रवादी शरद पवार गटाचे  6 नगरसेवक नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय ?
मोठी बातमी ! राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय ?
img
Nandini khandare More

राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून आता विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. या अपडेट नुसार  शरद पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण हिंगणा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सहा नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नगरसेवकांशी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा संपर्क होत नसल्याने शरद पवार गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर हे सर्व नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दरम्यान, नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अतुल लोंढे हे अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात आहेत. तर महायुतीकडून भाजपचे राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे मानले जात असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय समीकरणांबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

मात्र, या नगरसेवकांनी कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसून ते प्रत्यक्षात भाजपच्या गळाला लागले आहेत का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत या घडामोडींना कोणते वळण मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group