अहमदाबाद एअर इंडियाच्या  विमान अपघातात पायलटची चूक की घातपात ?  'त्या 'रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय ?
अहमदाबाद एअर इंडियाच्या विमान अपघातात पायलटची चूक की घातपात ? 'त्या 'रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय ?
img
Nandini khandare More

12 जून 2025  रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 चा भीषण अपघात झाला होता.  धक्कादायक म्हणजे उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदाच्या आत हे विमान कोसळले. या अपघातात 260 लोकांचा जीव गेला.दरम्यान आता या अपघाताची एक धक्कादायक माहिती समोर आली आहार. या अपडेटनुसार हा अपघात म्हणजे नक्की पायलट ची चूक  होती की हा घातपात होता असा संशय निर्माण झाला आहे. 

या अपघातात हे विमान मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला जाऊन धडकले. या अपघातात 260 लोकांचा जीव गेला. विमानातील फक्त एक प्रवासी जिवंत बाहेर येऊ शकला. या घटनेने संपूर्ण देश हादरला. विमान हॉस्टेलवर कोसळल्याने तिथेही 19 जणांचा जीव गेला. आता या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, अपघात नक्की कसा झाला, याबाबत अनेक प्रश्न आहेत. अनुभवी कॅप्टन सुमित सभरवाल हे या विमानाचे वैमानिक होते आणि त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर होते. दोघांकडेही अनेक तास विमान उड्डाणाचा मोठा अनुभव होता.

उड्डाणानंतर काही सेकंदाच दोन्ही इंजिनला इंधन पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. इंजिनला इंधन पुरवठा होणारे बटन बंद करण्यात आले होते. या विमान अपघाताबाबतचा तपास सुरू आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे कॉकपिटमधील एका वैमानिकाने मुद्दामहून इंधन नियंत्रण बटणे बंद केली होती. असा दावा करण्यात आला.

कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरवर CVR रेकॉर्ड झालेल्या संभाषणांमुळे या संशयाला अधिक वाव मिळाला. या रेकॉर्डिंगमध्ये, एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारताना दिसतोय की, तू इंधन का बंद केले? त्यावर दुसरा पायलट म्हणतो की, मी नाही केले. त्यानंतर काही सेकंदाच हे विमान कोसळले. भारताच्या एएआयबी या तपास संस्थेने आतापर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास नकार दिला आहे.

तपास पूर्ण होण्यापूर्वीच वैमानिकांना जबाबदार धरणे चुकीचे ठरेल, असे या संस्थेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुद्द्याम पायलटने इंधनाचे बटन बंद केले असे म्हणता येणार नाही. मात्र, विमानातील प्रवाशांच्या कुटुबियांना अजूनही उत्तर मिळू शकले नाही की, हा अपघात नक्की कोणत्या कारणाने झाला. कोणी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचेही सांगते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group