राज्यातील राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातून एक मोयही बातमी समोर येत आहे. अजितदादांवर आक्षेपार्ह विधान एका नगरसेवकाला चांगलाच भोवलं आहे. मिळलेल्या माहितीनुसार या नगरसेवकाची थेट पक्षातून हकालपट्टी कार्नाय्त आली आहे.
बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ यांनी अजित दादांच्या निधनावर आक्षेपार्ह विधान केलं होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये मासाळ यांनी रुपाली ताई मेली पाहिजे, अजित पवार मेला त्याने मला फरक पडला नाही असं विधान केलं होतं. त्यानंतर आता पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. मासाळ यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, किशोर मासाळ हे अजित पवार यांच्या जवळचा होता. अजित पवार या किशोर मासाळ यांचं भरभरुन कौतुक करायचे. अजित पवार यांच्या आवडत्या लोकांच्या यादीत ते होते. पण त्याच किशोर मासाळने अजिप पवार मेला त्याने मला फरक नाही पडला असं म्हटलं आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता राष्ट्र्वादीतून मासाळ यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘किशोर मासाळ यांनी केलेलं वक्तव्य फार घृणास्पद आहे आणि त्याची दखल पक्षाने घेतली आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे असं तटकरे म्हणाले.
सोशल मीडियावर क्लिप व्हायरल झाल्यानंतर किशोर मासाळ यांनी माफी मागितली होती. मासाळम्हटले होते की, ‘चार दिवसांपूर्वी माझी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात मी अजित पवारांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं. मी अजित पवारांचे कुटुंबिय आणि समस्त बारामतीकरांची माफी मागतो. मी जे बोललो त्याचा पश्चाताप म्हणून अजित पवारांचा अपघात झाला, त्या ठिकाणी एकदिवसाच अन्न त्याग आत्मक्लेष आंदोलन करणार आहे.’