होर्मुज खाडी बंद ! पेट्रोल- डिझेल महागणार? काय आहे अपडेट ?
होर्मुज खाडी बंद ! पेट्रोल- डिझेल महागणार? काय आहे अपडेट ?
img
Nandini khandare More
जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर आधीच भारताला महागाईचा मोठा फटका बसला आहे. याचदरम्यान आता आणखी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी इराणने थेट होर्मुज खाडी बंद करण्याचा निर्णय घेतला. आता होर्मुज खाडी पूर्णपणे बंद आहे. होर्मुज खाडीतून एकही जहाज येऊ शकत नाही. इराणने म्हटले की, जर कोणी होर्मुज खाडी पार करण्याची हिंमत केली तर थेट उडवून दिले जाईल. आता जगाची चिंता वाढली असून होर्मुज खाडी पूर्णपणे बंद आहे.

होर्मुज खाडी पूर्णपणे बंद असणे ही भारतासाठी अत्यंत मोठी धोक्याची घंटा आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे जंग अस्थिरतेच्या संकटात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार दिलेल्या धमक्यांमुळे चिंता वाढली. या परिस्थितीबाबत भारतातील प्रमुख व्यापार आणि उद्योग संघटना असलेल्या चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने चिंता व्यक्त केली आहे. कारण याचा घातक परिणाम थेट भारतावर होईल.

CTI चे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी एक निवदेन जारी केले. त्यात त्यांनी म्हटले की, 20 टक्के तेल याच मार्गाने येते. जर होर्मुज खाडी काही काळ बंद राहिली तर 1970 नंतरचे सर्वात मोठे ऊर्जा संकट येऊ शकते. पेट्रोल व डिझेलसह तेलाच्या किमतीत अचानक मोठी वाढ होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात सतत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी कधीच पूर्णपणे बंद नव्हती. इराण थोड्या कमी प्रमाणात पण जहाजांना सुरक्षित मार्ग देत होता. आता होर्मुज खाडी इराणकडून पूर्णपणे बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने फक्त भारतच नाही तर जग संकटात आहे. अमेरिकेच्या मोठे हल्ले करत असतानाच इराणकडून थेट होर्मुज खाडीत बंद करण्यात आली. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध सतत वाढत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group