मेष : आज तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदाने वेळ घालवाल. मित्रांवर पैसे खर्च होतील. निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जाल. सरकारी कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात सलोखा राहील. नवीन संधी नोकरीत मिळतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ : नवीन काम सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. नोकरी आणि व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. तुम्हाला पदोन्नती मिळेल. व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. सरकारकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. प्रतिष्ठेत वाढ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
मिथुन : आज तुमच्या कामात विलंब होईल. शरीरात आणि मनात उत्साहाचा अभाव राहील. पोटाचे आजार होतील. नोकरीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नकारात्मक वर्तनामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. राजकीय अडचणी अडथळा ठरतील. आज महत्त्वाची कामे किंवा निर्णय पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जातो. मुलांशी मतभेद होतील.
कर्क : आज नकारात्मक विचार तुम्हाला अस्वस्थ करतील. बाहेरचे अन्न खाणे तुमच्या आरोग्यासाठी वाईट ठरेल. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी वाद होईल. नवीन नाते संबंध फायदेशीर ठरतील. देवाकडून तुमची इच्छापूर्ती होईल.
सिंह : आज पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद होऊ शकतात. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता असेल. तुम्ही सांसारिक बाबींकडे दुर्लक्ष कराल. सार्वजनिक जीवनातील अपयश तुम्हाला त्रास देईल. जोडीदाराशी मतभेद होतील. आज काही लोकांना भेटणे विशेष आनंददायी ठरणार नाही. न्यायालयीन समस्यांचे निराकरण करण्यात विलंब होईल.
कन्या : आज तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहील. घरात आनंद आणि सुख शांतीचे वातावरण राहील. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. आजारातून आराम मिळेल. नोकरी-व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. तुमचे सहकारी कामात मदत करतील. प्रतिस्पर्ध्यांवर तुम्हाला विजय मिळेल.
तूळ : आज तुम्ही कल्पनाशक्ती आणि क्रिएटिव्हिटीचा सर्वोत्तम वापर करू शकाल. मुलांची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीची भेट उत्साहवर्धक ठरेल. तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. अनेक विचारांमुळे मन विचलित होईल. आज कोणाशी तरी बौद्धिक चर्चा किंवा वादविवादात सहभागी होण्याची संधी मिळेल,
वृश्चिक : आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिक भीतीचा अनुभव येईल. तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता वाटेल. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आईच्या तब्येतीत सुधारणा होईल. जमीन, वाहन इत्यादींच्या खरेदीसाठी कागदपत्रे तयार करताना सावधगिरी बाळगा.
धनु : तुम्हाला आज गूढ विद्या आणि अध्यात्माचे विशेष आकर्षण असेल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी चांगली वेळ आहे. मित्र आणि नातलगांच्या आगमनाने घरात आनंद असेल. तुमची कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. एखादा छोटा प्रवास फायद्याचा ठरेल. प्रतिष्ठेत वाढ होईल. प्रिय व्यक्तीला भेटण्याची शक्यता आहे.
मकर : तुम्हाला बोलण्यावर आणि वर्तनावर संयम ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद टाळा. भांडवली गुंतवणुक कराल. आर्थिकदृष्ट्या फायदा होईल. आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील. डोळ्यांचा त्रास होऊ शकतो. नकारात्मक विचार दूर केल्याने तुम्हाला फायदा होईल.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांचा आईवडिलांच्या आशीर्वादाने दिवस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आनंदी राहील. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसमवेत घरात उत्सवाचे वातावरण असेल. चविष्ठ आणि गोड पदार्थांचा आनंद घ्याल. सहलीचे नियोजन केले जाईल. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस चांगला आहे.
मीन : आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक करताना तुम्हाला खूप काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला सुस्तपणा आणि एकाग्रतेचा अभाव जाणवेल. धार्मिक कार्यात पैसा खर्च कराल. मित्र आणि नातेवाईकांशी मतभेद होतील. लोभ तुम्हाला तोट्यात टाकणार नाही याची काळजी घ्या.