विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर; मंत्रिमंडळाने घेतले 4 महत्त्वाचे निर्णय
विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर; मंत्रिमंडळाने घेतले 4 महत्त्वाचे निर्णय
img
Nandini khandare More

सध्या राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता राज्यमंत्रिमंडळाकडून काही महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान आता अनेक मोठी बातमी समोर आली आहे. आज पार पडलेल्या  मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 

 मिळालेल्या माहितीनुसार,  या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्यातील उद्योग, करपद्धत तसेच महाविद्यालयांबाबत हे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते.

सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेस मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाअंतर्गत एकूण तेरा विभागांची पूनर्रचना करण्यात आली आहे. यामुळे एकाच विभागात असलेल्या दोन उपविभागांचे स्वतंत्र विभाग होणार आहेत. आता ३३ प्रशासकीय विभाग होते, त्यांची संख्या १० ने वाढून ४३ होणार आहेत. पण नवीन पद निर्मिती होणार नाही, पण विभागांना आता सुलभपणे काम करता येईल, अशा पद्धतीने कामकाजांची विभागणी होणार आहे. निर्णय प्रक्रिया गतीमान होणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग
राज्यातील नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता देण्यात आल्या आहेत. या निर्णयात विस्तारीकरणात नवीन विद्याशाखा, अभ्यासक्रम व नवीन विषय, तुकडी यांना मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

वित्त विभाग
केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मधील तरतूदींना सुसंगत आणि सूसत्रतेसाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा तसेच त्याअन्वये महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२६ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

उद्योग विभाग
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करणार केली जाणार आहे. अध्यादेश काढण्यास तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या चार निर्णयांचा समाजातील अनेक घटकांस चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील वस्तू व सेवा कर अधिनियमात सुधारण करण्यास मान्यता देण्यात आल्याने आता करप्रणाली आणखी सुलभ होण्याची शक्यता आहे. तसेच काही नव्या महाविद्यालयांना मान्यता दिल्यामुळेही विद्यार्थ्यांस उच्च शिक्षण घेण्यासाठी नव्या संधी प्राप्त होणार आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group