गेल्या आठवड्या पासून राज्यात अनेक दुःखद घटना घडत असून या घटनाच चक्र सातत्याने सुरूच आहे. दरम्यान आता आणखी एक दुर्घटना घडली असल्याची बातमी समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगावातील एका कंपनीत कार्बनडायऑक्साईडची गळती झाल्याने दोन मजूराचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. तर तीन मजूर जखमी झाले आहेत. मजूरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि रेस्क्यु ऑपरेशन वेगाने सुरु आहे.
सुरुवातीला गॅस सिलेंडर स्फोटाची माहिती समोर आली होती. मात्र नंतर मिळालेल्या माहितीनुसार कंपनीत CO₂ गॅस गळती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत गणेश उंबरे आणि वैभव थोरात या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.