भीषण एल निनो सक्रिय! मान्सूनवर संकट; देशावर दुष्काळाचे सावट?
भीषण एल निनो सक्रिय! मान्सूनवर संकट; देशावर दुष्काळाचे सावट?
img
Nandini khandare More

प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेच्या सीपीसीने केली आहे. यंदाचा एल निनो 1950 नंतरचा सर्वात तीव्र ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, डिसेंबरपर्यंत तो अतितीव्र स्वरूप धारण करू शकतो. तसेच 2027 च्या सुरुवातीपर्यंत त्याचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, तीव्र एल निनोचा भारताच्या मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता असून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा सरासरीच्या सुमारे 90 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाचे प्रादेशिक वितरण असमान राहिल्यास काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.

हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांच्या मते, एल निनो जूनमध्ये सक्रिय होईल असा अंदाज आधीच व्यक्त करण्यात आला होता. गेल्या महिनाभरातील प्रशांत महासागराच्या तापमानातील वाढ लक्षात घेऊन सीपीसीने आता त्याची अधिकृत घोषणा केली आहे. डिसेंबरपर्यंत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून यंदाचा हंगाम मोठ्या प्रमाणात एल निनोच्या प्रभावाखाली राहू शकतो.

सध्या मान्सूनच्या प्रगतीत होत असलेल्या विलंबामागे एल निनोचा अप्रत्यक्ष प्रभाव असू शकतो. मेडन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) हा पावसासाठी महत्त्वाचा घटक अद्याप भारतीय उपखंडावर सक्रिय नसल्याने आणि अरबी देशांकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळेही मान्सूनची वाटचाल मंदावली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group