लंडनमध्ये भारतीय वंशज कुटुंबाचा ४०० फूट उंचीवरून कोसळून अंत ! ९ वर्षांचा मुलासह आई वडिलांचा मृत्यू
लंडनमध्ये भारतीय वंशज कुटुंबाचा ४०० फूट उंचीवरून कोसळून अंत ! ९ वर्षांचा मुलासह आई वडिलांचा मृत्यू
img
Nandini khandare More

भारतीय वंशज कुटुंबाचा ४०० फूट उंचीवरून कोसळून दुर्दैवी अंत झाला असल्याची धक्कादायक घटना लंडन मध्ये  घडली ही  ही घटना अत्यंत धक्कादायक असून हि घटना आत्महत्या आहेकी कि आणखी काही कारण असू शकते याचा तपास सुरु आहे. ही घटना दक्षिण लंडन येथील एका  निवासी इमारती मध्ये घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ४६ वर्षीय अदिती विजय परळकर, त्यांचे ४७ वर्षीय पती राकेश नारायण पै आणि त्यांचा अवघा ९ वर्षांचा मुलगा सिड पै यांचा समावेश आहे. या भीषण घटनेमुळे लंडनमधील भारतीय समुदायामध्ये प्रचंड खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे. ब्रिटिश पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा हत्या आणि आत्महत्या या दोन्ही अँगलने तपास करत आहेत.

४०० फूट उंचीवरून कोसळले संपूर्ण कुटुंब मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब दक्षिण लंडनच्या 'एलिफंट अँड कॅसल' भागातील चर्चयार्ड रो येथील ४५ मजली हायपॉइंट टावर ब्लॉकच्या ३६ व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये राहत होते. २७ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास हे तिघेही अचानक ३६ व्या मजल्याच्या बाल्कनीतून, म्हणजेच साधारण ४०० फूट उंचीवरून खाली कोसळले.

घटनेची माहिती मिळताच मेट्रोपॉलिटन पोलीस, लंडन अ‍ॅम्ब्युलन्स सर्व्हिस, लंडन एअर अ‍ॅम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडच्या चमूने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, इतक्या उंचीवरून खाली पडल्यामुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. ९ वर्षांचा एकुलता एक मुलगा गंभीर आजारांशी झुंजत होता अदिती आणि राकेश हे २००० च्या सुरुवातीच्या काळात भारतातून लंडनमध्ये आले होते. तिथे त्यांनी स्वतःचा कन्सल्टन्सी व्यवसाय सुरू केला आणि लंडनमध्येच आपले नवीन जग निर्माण केले होते. मात्र, त्यांच्या सुखी संसाराला एका ग्रहण लागलं होतं. 

दरम्यान, कौटुंबिक मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा ९ वर्षांचा मुलगा सिड हा जन्मापासूनच अत्यंत गंभीर आजारांशी झुंजत होता. तो जन्मापासून मूकबधिर होता आणि त्याला शिकण्यातही अनेक अडचणी येत होत्या. तो अंशतः दिव्यांग होता आणि गेल्या काही काळापासून किडनीच्या गंभीर आजाराने ग्रस्त होता. आपल्या एकुलत्या एक मुलाच्याआपल्या एकुलत्या एक मुलाच्या या आजारपणामुळे हे दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून प्रचंड मानसिक आणि भावनिक दबावाखाली होते.

अदिती डिप्रेशनमध्ये होत्या; सुसाईड पॅक्टचा संशय ब्रिटिश वृत्तपत्र 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, मुलाच्या सततच्या काळजीमुळे आणि देखभालीमुळे अदिती परळकर या गेल्या दीर्घकाळापासून तीव्र नैराश्याचा सामना करत होत्या. त्यांच्या एका मित्राने सांगितले की, "दोघांवरही प्रचंड मानसिक ताण होता, पण विशेषतः अदितीसाठी या परिस्थितीचा सामना करणे अत्यंत कठीण जात होते." पोलिसांना संशय आहे की, या नैराश्यातूनच पती-पत्नीमध्ये 'सुसाईड पॅक्ट' झाला असावा, ज्यातून त्यांनी आधी मुलाला खाली फेकले किंवा सोबत घेऊन स्वतः उडी मारली. मात्र, दुसऱ्या एका मित्राने यावर शंका उपस्थित करत सांगितले की, "अदिती नक्कीच संघर्ष करत होत्या, पण राकेश नेहमी खूप शांत आणि संतुलित असायचे, त्यामुळे त्यांनी असे पाऊल उचलले असेल यावर विश्वास बसत नाही."

पोलिसांचे जनतेला आवाहन लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, या प्रकरणाचा तपास सर्व बाजूने सुरू असून अद्याप कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीत. कार्यवाहक डिटेक्टिव्ह सुपरिंटेंडेंट डॅन व्हिटन यांनी सांगितले की, "आमच्या संवेदना अदिती, राकेश आणि सिड यांच्या नातेवाईकांसोबत आहेत. या दुर्दैवी मृत्यूंमागील खरे सत्य शोधण्यासाठी आमचे पथक वेगाने काम करत आहे. आम्ही सध्या सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत. तपास पूर्ण होईपर्यंत जनता आणि प्रसारमाध्यमांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा अटकळी बांधण्यापासून दूर राहावे," असे आवाहन त्यांनी केले आहे. उच्चशिक्षित आणि यशस्वी भारतीय कुटुंबाचा लंडनमध्ये असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group