लाडकी बहीण योजना बंद करणार? ''या'' बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
लाडकी बहीण योजना बंद करणार? ''या'' बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
img
Nandini khandare More


राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता सुरुवातीपासून च मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चर्चेत असून त्यावरून अनेक वाद निर्माण झाले. दरम्यान ही महत्वकांक्षी योजना बंद पडणार असल्याचा दावा सतत विरोधकांकडून होत आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा एका बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ निर्माण झाली आहे. 

पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील एलपीजी सिलेंडरची वार्षिक मर्यादा ९ वरून थेट ४ केल्याने कोट्यवधी लाभार्थी संतप्त झाले आहेत. या निर्णयामुळे अनुदानापासून वंचित राहणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवारांनी सरकारवर टीका करत याला "विश्वासघातकी सरकार" म्हटले आहे. मतांसाठी जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला असून, लाडकी बहीण योजनेबाबतही असाच प्रकार घडत असल्याचे म्हटले आहे.
लाडकी बहीण योजना बंद करणार? रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ; काय आहे ट्विट?

पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आल्याने कोट्यवधी लाभार्थ्यांना धक्का बसला आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत एलपीजी सिलेंडरची वार्षिक मर्यादा 9 वरून आता डायरेक्ट 4 करण्यात आली आहे. यामुळे देशातील कोट्यवधी लाभार्थी हे नाराज झाले आहेत. पूर्वी 9 सिलेंडरवर सबसिडी देण्यात येत होती, मात्र आता ती संख्या फक्त 4 असेल. याच मुद्यावरून आता विरोधकांनीही सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात X ( पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट केली आहे. सरकारने उद्या उज्ज्वला योजनाच सरकारने गुंडाळली तर आश्चर्य वाटणार नाही, असाच प्रकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबीतही घडू शकतो, असा इशाराच एकप्रकारे रोहित पवार यांनी दिलं आहे. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ माजली आहे.

” उज्ज्वला योजनेतील अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या १२ वरुन आधी ९ केली आणि आता ९ वरुन थेट ४ करण्यात आली. उद्या ही उज्ज्वला योजनाच सरकारने गुंडाळली तर आश्चर्य वाटणार नाही. असाच प्रकार लाडक्या बहिणींच्या बाबतीतही सुरु आहे. निवडणुकीत मतांची बेगमी होताच सरसकट लाभ दिल्यानंतर आता वेगवेगळे निकष लावून ८० लाख लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढण्यात आलं. उद्या आणखी निकष लावून हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ दिला जाईल किंवा ही योजनाही अशीच बंद केली जाईल.” असं रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

” पुढील निवडणुकीत पुन्हा अशाच कुठल्यातरी योजनेचं तात्पुरतं गाजर दाखवलं जाईल. कारण मतांसाठी फसवणूक करणारं हे विश्वासघातकी सरकार आहे” असं टीकास्त्रही रोहित पवार यांनी सरकारवर सोडत निशाणा साधला .


इतर बातम्या
Join Whatsapp Group