गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात अनेक दुःखद घटना घडत आहेत. दरम्यान आता अशीच एक धक्कादायक आणि हृदयडद्रावक घटना समोर आली आहे.
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीपात्रात झालेल्या बोट दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, पाच जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीपात्रात प्रवाशांनी भरलेली बोट अचानक उलटली. या दुर्घटनेत पाच जणांना वेळेत बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवण्यात आले. मात्र, दोन जण नदीत बेपत्ता झाल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली. नंतर या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.