..तर थेट पेट्रोल पंपाचा परवानाच रद्द होणार !
..तर थेट पेट्रोल पंपाचा परवानाच रद्द होणार !
img
Nandini khandare More

जागतिक तणावाच्या पार्श्ववभूमीवर देशात सध्या अनेक घडामोडींना वेग आला असून. महागाईचा भडका तर झालाच आहे. परंतु आता , पेट्रोल पंप चालकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

पेट्रोल -डिझेलचे वाढते भाव आणि  इंधनाचा तुटवडा पसरल्याच्या अफवांमुळे काही ठिकाणी लोकांनी ड्रम किंवा कधी कॅनमधून ज्यादा पेट्रोल नेल्याच्या बातम्या समोर आल्या, त्यामुळे इंधन टंचाई जाणवू लागली. इंधनाचा जास्त साठा करू नका असे निर्देश सरकारने दिल्यानंतरही काहींचे हे उद्योग सुरू होते. मात्र आता यावर कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंदर्भातच एक मोठी अपडेट समोर आली आहे, पेट्रोल पंप चालकांना घाम फोडणारे वृत्त समोर आले आहे.

नवीन डिझेल परिपत्रक काढण्यात आलं आहे. त्यानुसार, कॅनमध्ये डिझेल दिल्यास थेट पेट्रोल पंपाचा परवाना डायरेक्ट रद्द होणार आहे. यामुळे पेट्रोल पंप चालकांचं धाबं दणाणलं आहे. नवीन डिझेल परिपत्रकामुळे लाखो प्रामाणिक ग्राहकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी CAMIT कडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group