एकनाथ शिंदेंना नाशिक मधून दिलासा नाहीच ! नेमकं घडतंय काय ?
एकनाथ शिंदेंना नाशिक मधून दिलासा नाहीच ! नेमकं घडतंय काय ?
img
Nandini khandare More

नाशिक विधान परिषद निवडणूकच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु असून असून आता एकनाथशिंदे यांची डोके दुखी वाढण्याची शक्यता आहे. 

शिवसेना शिंदे गटाकडून नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. पण नाशिकच्या जागेसाठी भाजपचे स्थानिक नेते गणेश गीते आणि गोकुळे गीते आग्रही होते. महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटल्यानंतरही दोघा गीते बंधुंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यात गणेश गीते यांनी माघार घेतली असून मात्र गोकुळ गीते माघार घेत नसल्याने दराडे यांच्या विजयाच्या मार्गात अडसर आहे. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी काल मुंबईहून खास उदय सामंत नाशिकला आले होते. गिरीश महाजन सुद्धा नाशिकमध्ये होते. दोन्ही नेत्यांनी बरेच प्रयत्न केले. पण गोकुळ गीते माघार घ्यायला तयार नाही. त्यामुळे गिरीश महाजन आणि उदय सामंत यांना रिकाम्या हाताने परतावं लागलं आहे.

गोकुळ गीते अद्यापही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. काल दिवसभर गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्याकडून गोकुळ गीते यांच्या मन धरणीचा प्रयत्न सुरु होते. मात्र गोकुळ गीते यांनी दोन्ही नेत्यांची भेट टाळली. लवकरच तोडगा काढू असा उदय सामंत यांना विश्वास आहे. गिरीश महाजन आज रात्री पुन्हा नाशिक मुक्कामी येणार आहेत. तर उदय सामंत उद्या रात्री नाशिक मध्ये येण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आता निघून गेली आहे. त्यामुळे गोकुळ गीते यांनी आता नरेंद्र दराडे यांना समर्थन जाहीर करावं अशी शिवसेनेची मागणी आहे. गीते बंधु हे गिरीश महाजन यांचा शब्द मानतात असं बोललं जातं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group