नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्व्भूमीवर नाशिकच्या राजकरणात मोठी उलथापालथ सुरु आहे. महायुतीला निवडणुकीतील बंडखोरी मागे घेण्यात यश आले असले तरी मात्र आता नाशिक मधून हायुतीला मोठा धक्का बसला आहे
नाशिक विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली आहे. नाशिकमधून नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. परंतु जागा वाटप होण्याच्या आधीच भाजपच्या वतीने गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर दुसरीकडे त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान अर्ज माघे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
परंतु गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, त्यांनी शेवटच्या दिवशी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याने आता नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठं ट्विस्ट निर्माण झालं असून, ही लढत आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दराडे आणि गोकुळ गीते यांच्यामध्ये होणार आहे. नरेंद्र दराडे यांच्यासमोर गोकुळे गीते यांच्या रुपानं मोठं आवाहान निर्माण झालं आहे. गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले मात्र तरी देखील गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत.