दिल्लीत मोठी दुर्घटना ! रेस्टॉरंटला भीषण आग, १० जणांचा होरपळून मृत्यू
दिल्लीत मोठी दुर्घटना ! रेस्टॉरंटला भीषण आग, १० जणांचा होरपळून मृत्यू
img
Nandini khandare More


दिल्लीतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील एका रेस्टॉरंटला भीषण आग लागून त्यात  १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.  दिल्लीतील गजबजलेल्या आणि प्रसिद्ध मालवीय नगर भागातील एका रेस्टॉरंटला आज भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर २५ पेक्षा जास्त जण गंभीर जखमी आहेत. या आगीमुळे रेस्टॉरंटमधून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडत असून, परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शेजारील दुकाने आणि इमारती तातडीने रिकाम्या करण्यात आल्या आहेत. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. पण ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे.

रेस्टॉरंटमध्ये अचानक उसळल्या आगीच्या ज्वाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मालवीय नगर येथील एका इमारतीमध्ये असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आज अचानक आग लागली. रेस्टॉरंटमध्ये लाकडी फर्निचर आणि ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आगीने काही वेळातच अत्यंत रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाला इतक्या तीव्र होत्या की आजूबाजूच्या परिसरात धुराचे काळे साम्राज्य पसरले. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. २५ जण भाजल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group