राज्यातील घडामोडीना वेग आला असून आता एक महत्वाची बातमी सामोर आली आहे. अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची निस्वाद करण्यात आली आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे मुंबईला राष्ट्रीय स्तरावरील महापौर संघटनेत महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे.
उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय महापौर परिषदेच्या 117 व्या कार्यकारी समितीच्या बैठकीत रितू तावडे अधिकृतपणे उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. देशभरातील विविध शहरांतील सुमारे 240 महापौरांचा समावेश असलेल्या या प्रतिष्ठित संघटनेत मुंबईला मानाचे स्थान प्राप्त झाले असल्याचे मानले जात आहे.