कर्नाटकच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. तिथल्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून आता एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून डी के शिवकुमार यांच्याकडे नेतृत्व सोपविण्याची तयारी काँग्रेस अंतर्गत सुरू होती.
सिद्धरामैय्या हे गुरुवारी दुपारी ३ वाजता राजभवनातून बाहेर पडले. त्यांच्याबरोबर भावी मुख्यमंत्री डी के शिवकुमार देखील होते. सिद्धरामय्या यांनी राज्यपालांच्या सचिवांकडे राजीनामा दिला. आता डीके शिवकुमार यांचे नाव अधिकृतपणे मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस पक्षाकडून जाहीर होईल.
सिद्धरमय्या यांनी त्यांच्या बंगळुरूमधील निवासस्थानी एका विशेष बैठकीत सर्व मंत्र्यांसमक्ष आपण मुख्यमंत्रिपद सोडत असल्याचे जाहीर केले. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे सध्या त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव राज्याबाहेर असले, तरीही आपण आपला राजीनामा त्यांच्याकडे पाठवून देणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले. जाहीर केल्याप्रमाणे दुपारी तीन वाजता सिद्धरमय्या यांनी राजीनामा दिल्याने डी के शिवकुमार यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.