राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे नावं फायनल !
राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे नावं फायनल !
img
Nandini khandare More

विधानपरिषद निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच झाली असून अखेर आता महायुतीतील पक्षांतील उमेदवार फायनल होत आहेत. दरम्यान आता पुढे आलेल्या माहितीनुसार, भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावेही फायनल झाली आहेत. 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेल्या विधान परिषदेच्या दोन जागा आल्या आहेत. कोकण आणि पुण्याची जागा राष्ट्रवादीला सुटली आहे. कोकणमधून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे असणार आहेत. तर पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादीत अजून माथापच्ची सुरू होती. सकाळी 9 वाजल्यापासून राष्ट्रवादीची बैठक सुरू होती. दुपार झाली तरी नाव फायनल होत नव्हते. अखेर आता  विक्रम काकडे यांचे नाव फायनल झाले आहे. काकडे हेच राष्ट्रवादीचे पुण्यातील उमेदवार असणार आहेत.

पुण्यातील जिजाई बंगल्यावरती सकाळी नऊ पासून राष्ट्रवादीची बैठक सुरू होती. पुणे जिल्ह्यातील आजी-माजी आमदार राष्ट्रवादी पदाधिकारी यांची सुनेत्रा पवारांसोबत बैठक सुरू होती. विक्रम काकडे यांना तिकीट देण्यास सर्वांचा विरोध होता. अनेकांनी आक्षेप घेतला होता. मात्र, या सर्वांची मनधरणी करण्यात सुनेत्रा पवार यांना यश आलं आहे. सुनेत्रा पवार यांनी अखेर काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group