मुंबईत  आंदोलन पेटलं !  रोहित पवारांसह जितेद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात
मुंबईत आंदोलन पेटलं ! रोहित पवारांसह जितेद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात
img
Nandini khandare More

अमेरिका इराण तणावामुळे सध्या देशात महागाईने डोके वर काढले असून आता ते सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. दरम्यान , वाढत्या महागाईविरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईत आंदोलन करण्यात आलं आहे. दरम्यान हे आंदोलन आता तीव्र झालं असून या आंदोलना संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. 

आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चुल मांडून चपात्या तयार करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी धक्काबुक्की आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं.

या कारवाईदरम्यान शिवसेनेचे जितेंद्र आव्हाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता.

इतर बातम्या
Join Whatsapp Group