मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात; सरकारला दिला इशारा
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात; सरकारला दिला इशारा
img
Nandini khandare More

पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून महाराष्ट्र तापला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे  आंतरवाली सराटीत उपोषणाला बसले. यावेळी ना मंडप ना कुलर.. थेट आंतरवाली सराटीच्या शेतशिवारात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मे महिना सुरू अजून कडाक्याचे उन्ह पडले आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. उष्णघाताची समस्या अधिक आहे. सध्या आंतरवाली सराटीत 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान आहे.

 40 अंश सेल्सिअसच्या पुढील तापमानात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाच्या काही मागण्यांकरिता जरांगे पाटील उपोषणाला बसले. सरकारच्या शिष्टमंडळाने कालच जरांगे पाटील पाटील यांची भेट घेतली. मात्र, काही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिले. जरांगे यांनी उपोषणाला सुरूवात केली.

यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.  हे आंदोलन उधळण्याचा प्रयत्न सरकारने करू नये , ते सरकारला जड जाईल असा इशारा त्यांनी दिला. तर उन्हातच सरकारशी चर्चा होणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group