इम्रान हाश्मी भोंदूबाबाअशोक खरातची भूमिका साकारणार  ?  पहा चाहते काय म्हणाले ?
इम्रान हाश्मी भोंदूबाबाअशोक खरातची भूमिका साकारणार ? पहा चाहते काय म्हणाले ?
img
Nandini khandare More

नाशिकमधील अधिक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला चक्रावून सोडले आहे. दररोज या प्रकरणात काहीनाकाही खुलासे होत आहेत. दरम्यान आता भोंदूबाबा खरातवर चित्रपट निघणार असल्याची चर्चा आहे. 

भोंदूबाबा अशोक खरातच्या जीवनावर महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स नावाने सिनेमा येत आहे. अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे देखील नाव जोडले जात होते. त्यामुळे सिनेमामध्ये देखील रुपाली चाकणकर हे पात्र दाखवण्यात येणार आहे. ही भूमिका अभिनेत्री दीपाली सय्यद साकारणार आहे.

अशोक खरातच्या जीवनावर आधारित सिनेमात अभिनेता इम्रान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, या चर्चा ऐकून इम्रानचे चाहते नाराज झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर इम्रान हाश्मीच्या फॅन पेजची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.'इम्रान हाश्मीचे चाहते म्हणून आम्ही इच्छा आहे की त्याने गंभीर आरोप असलेले पात्र सकारु नये' असे चाहत्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स सिनेमात कोणता अभिनेता दिसणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group