मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा;नेमकं काय घडतंय ?
मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा;नेमकं काय घडतंय ?
img
Nandini khandare More

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीगटातून (अजित पवार ) मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील यांनी राजीनामा दिला असल्याची बातमी समोर आली आहे. 

विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील निष्ठावंताची खदखद समोर आली आहे. राष्ट्रवादीचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला पुणे आणि कोकणची जागा मिळाली आहे. पुण्यातून विक्रम काकडेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काकडे हे अलिकडेच पक्षात दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच नाराजीतून रामदास गाडे यांनी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताना म्हटले की, ‘निष्ठावंतांना पक्षांमध्ये स्थान नसल्याने मी माझ्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी संजय काकडे यांनी राष्ट्रवादी फोडण्याचे काम केलं. त्याच संजय काकडे यांच्या मुलाला उमेदवारी देणे हे चुकीचं आहे. विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली असल्यामुळे मी माझ्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.’

इतर बातम्या
Join Whatsapp Group