काल रविवारी आयपीएल 2026 च्या अंतिम सामना पार पडला या सामन्यात गुजरात टायटन्स या टीमला ला पराभव पचवावा लागला. दरम्यान आता याच टीम विषयी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळल्यानंतर हॉटेलकडे परतत असलेल्या गुजरात टायटन्सच्या टीम बसला अचानक आग लागली.
समोर आलेल्या माहितीनुसार बसमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने मदतकार्य राबवून बसमधील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली, तरी खेळाडूंना सुमारे एक तास रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागले होते. गुजरात टायटन्ससाठी अत्यंत वाईट रात्र रविवारची रात्र गुजरात टायटन्ससाठी सर्वच पातळ्यांवर निराशाजनक आणि त्रासदायक ठरली.
आधीच आयपीएलच्या महामुकाबल्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत जेतेपदावर नाव कोरले. तर पराभवाच्या पाठोपाठ टीम बसला आग लागल्यामुळे खेळाडूंमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.