इराण युद्धामुळे संपूर्ण जगाला चिंता लागली असून त्याचे विपरीत परिणाम अनेक देशांना सहन करावे लागत आहेत. दरम्यान महागाईने डोके वर काढले असून गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात वाढ कमी जास्त होताना दिसतेय दरम्यान आता मात्र सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव घसरला आहे. आता सोन्यासाठी तुम्हाला कमी पैसे द्यावे लागणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे पाचशे रुपयांची तर चांदीच्या दरात प्रती किलोमागे तीन हजार रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळाली.
सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात सोन्याचा दर आता जीएसटी सह 1 लाख 59 हजार 135 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांपर्यंत घसरला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 72 हजार 950 रुपये प्रति एक किलोपर्यंत खाली आला आहे.