मराठा आरक्षणावरून आता राज्यातील वातावरण पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. जरांगे यांनी पुन्हा एकदा लढाईची मशाल हातात घेतली असून आजपासून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून त्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. आता याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
रणरणत्या उन्हात मनोज जरांगे उपोषण करत आहेत. त्यांच्या भोवती मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली आहे. आर या पारची लढाई सुरू झाल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष जरांगेंकडे लागलं आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं आणि त्यांनी उन्हात बसू नये म्हणून स्वत: राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपोषण स्थळी आले आहेत. जरांगे यांनी उपोषण सोडावं म्हणून त्यांनी ड्राफ्ट करून आणला आहे. हा ड्राफ्ट त्यांनी मनोज जरांगे यांना दाखवला आहे. यातील बऱ्याच मागण्यांवर जरांगे सहमत झाले आहेत. काही मागण्यांवर ते अभ्यासकांसोबत आज संध्याकाळी चर्चा करणार आहेत. अभ्यासकांनी अभिप्राय दिल्यानंतरच जरांगे पुढची भूमिका ठरवणार आहेत.आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यातून अभ्यासक येतील. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून पुढची भूमिका ठरवू, असं मनोज जरांगे म्हणाले. त्यानंतर त्यांनी मीडियासमोरच राज्यातील अभ्यासकांना आवाहन केलं..
या मागण्यांवर सहमती
>> कुणबी प्रमाणपत्रांबाबत राज्य सरकारवतीने अधिकृत सूचना देणार आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांना सूचना दिली जाणार आहे
>> 58 लाख नोंदी सापडल्या कुणबीप्रमाणपत्र द्या. दिले असेल तर व्हॅलिडिटी देणार आहे. ज्या अधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिलं नाही, त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश काढणार आहेत.
>> जात पडताळणीचा आढावा प्रत्येक 15 दिवसाने घेणार आहे.
>> स्वतंत्र मराठा मंत्रालय एक महिना मागितला. मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात निर्णय घ्यावा
>> बलिदान दिलेल्यांना 15 दिवसात पैसे देणार.
>> कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपाबाबतचा आढावा दर 8 दिवसाने घेणार, जिल्हाधिकारी कार्यालयाला हेल्पलाईन देऊ. हे मान्य
>> ग्रामस्तरीय कामकाजाचा आढावा 15 दिवसात घेणार आहे. त्याच्याही सूचना काढणार आहेत. त्याही काढतो म्हणाले.
>> अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे पैसेही देतो म्हणाले. त्याच्याही सूचना काढणार आहे.
या मागण्यांवर अभ्यासकांसोबत होणार चर्चा
>> हैद्राबाद संस्थानच्या गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने एसओपी तयार केली आहे. एसओपी योग्य आहे का? हे अभ्यासकांना विचारून सांगणार आहे.
>> सातारा संस्थानचा गॅझेटियरचा जीआर एक महिन्यात काढू म्हणाले. आम्ही म्हणाले एक दिवसात काढा. ते काढणार आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांशी आणि कायदे तज्ज्ञांशी बोलणार आहेत. ते करतो म्हणाले.
>> सारथीच्या योजना पुन्हा सुरू करणार आहे. पत्रक काढणार आहे. विखे पाटील यांनी तुम्ही ओके म्हणून सांगा. मी पत्रक काढतो असं आश्वासन दिलं. त्यावर, मला याबाबत अभ्यासकांशी बोलावे लागेल. हे योग्य आहे का विचारावं लागेल, असं जरांगे म्हणाले. याबाबत सरकारला शासन आणि प्रशासन स्तरावर सूचना काढाव्या लागतील.