CNG च्या दरात पुन्हा वाढ ! कितीवर पोहोलचा आकडा?
CNG च्या दरात पुन्हा वाढ ! कितीवर पोहोलचा आकडा?
img
Nandini khandare More

सतत वाढत असलेल्या इंधन दरामुळे सर्वसामन्यांचं बजेट आता कोलमडायला लागलाय. दर दिवशी  ची ही महागाई आता सामान्यांचा खिशाला कात्री लावणारी ठरली आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा CNG च्या दरात वाढ झाली असल्याची अपडेट आली आहे.

 सीएनजी वाहनचालकांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. पुण्यात गुरुवारपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात आता सीएनजीचा दर 94.85 रुपये प्रतिकिलो झाला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सर्व पेट्रोल पंपांवर हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबई, नाशिकमध्येही सीएनजीच्या दरात 1.35 रुपयांची वाढ झाली असून नवीन दर 96.50 रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे.

मे महिन्यात सीएनजीच्या दरात झालेली ही दुसरी वाढ मानली जात आहे. यापूर्वी 9 मे रोजीही दरात वाढ करण्यात आली होती. नैसर्गिक वायूच्या वाढलेल्या इनपूट कॉस्टमुळे ही दरवाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सीएनजी हा स्वस्त आणि पर्यावरणपूरक इंधन पर्याय मानला जात असल्याने अनेक वाहनचालकांनी सीएनजी वाहनांना पसंती दिली होती. मात्र आता वाढत्या महागाईसोबत सीएनजीचे दरही वाढल्याने वाहनधारकांची चिंता वाढली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group