ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल !  नेमकं कारण काय?
ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल ! नेमकं कारण काय?
img
Nandini khandare More


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही गंभीर बाब नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. 

नियमित वैद्यकीय तपासणीसाठी  ते रुग्णालयात गेले असून डॉक्टरांकडून आवश्यक तपासण्या करण्यात येत आहेत. पवार यांच्या तब्येतीबाबतची बातमी समोर आल्यानंतर कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती, मात्र प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाढते वय आणि सातत्याने सुरू असलेला राजकीय तसेच सामाजिक दौरा लक्षात घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांच्या काही नियमित वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. यासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही चिंतेची बाब नसल्याचं सांगण्यात येत असून सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group