सध्या राज्यातील हवामानात कमालीचे बदल होत असून आता महाराष्ट्रात पावसाचं आगमन केव्हा होणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी मीडियाला मान्सूनबाबतची महत्त्वाची अपडेट दिली आहे. येत्या दोन दिवसात केरळमधील स्थिती समजणार आहे. त्यानंतर पावसाचे महाराष्ट्रात आगमन होणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.
केरळमध्ये अजून मान्सून दाखल झालेला नाही. पण केरळमध्ये सध्या मान्सूनला पोषक स्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. अंदमान निकोबार भागात सध्या ढग निर्माण झाले आहेत. दोन दिवसात केरळ मधील स्थिती समजेल. हवामान विभागाकडून 26 तारीख आणि किंवा चार पाच दिवसात पावासचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली होती. आणखी दोन दिवस आहेत. त्यामुळे स्थिती समजेल, असं एसडी सानप यांनी सांगितलं.
असं असलं तरी नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होत आहेत. दोन दिवसात केरळमध्ये मान्सूनची स्थिती समजणार आहे. त्यानंतरच महाराष्ट्रात पावसाचं आगमन कधी होईल हे थेट सांगता येणार आहे, अशी माहितीही सानप यांनी दिली.