आजचे राशिभविष्य :  आज ‘या’ राशींचे नशीब चमकणार;  पहा तुमचे राशिभविष्य काय सांगते ?
आजचे राशिभविष्य : आज ‘या’ राशींचे नशीब चमकणार; पहा तुमचे राशिभविष्य काय सांगते ?
img
Nandini khandare More


मेष : आजचा दिवस आर्थिक बाबतीत फायदेशीर राहील. दिवसभरात नोकरी किंवा व्यवसायात थोडा तणाव किंवा संघर्ष होऊ शकतो. मात्र तुम्ही केलेले परिश्रम व प्रयत्नांचा आज तुम्हाला फायदा मिळेल. कुटुंबात सुख-शांती व सौख्य मिळेल. प्रेमजीवनात जवळीकता राहील. कार्यक्षेत्रात सुरुवातीला मंदी असेल नंतर वेग येईल.

वृषभ : आज चंद्राचे गोचर पंचम नंतर सहाव्या स्थानात होईल. दिवसाची सुरुवात उत्साहजनक राहील. कार्यक्षेत्रात तुम्हाला सहकाऱ्यांची अपेक्षित मदत मिळेल. कौटुंबिक जीवनही तुमच्यासाठी अनुकूल असेल. वाहनं व सुखसाधनांची प्राप्ती होईल. एखाद्या मित्राकडून गिफ्ट मिळेल. मात्र आज विरोधकांपासून सावध राहा.

मिथुन : मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आज नोकरी व्यवसायात नवीन गोष्टी करण्याची संधी मिळेल. तुमच्या मनात काही नवीन विचार येतील जे तुम्हाला पुढे घेऊन जातील. आर्थिक प्रयत्नांना पूर्ण लाभ मिळेल. शिक्षण क्षेत्रातही तुमचं प्रर्दशन चांगलं होईल. नवीन कामाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

कर्क : आजचा दिवस सुखकारक राहील. राशीचा स्वामी चंद्राचे गोचर तुमच्या तृतीय नंतर चतुर्थ स्थानात होईल. त्यामुळे केलेल्या प्रयत्नांचा लाभ दुसऱ्या भागात मिळेल. तुम्ही कोणत्यातरी पार्टी किंवा मनोरंजक कार्यक्रमाचा आनंद आज घेऊ शकता. कुटुंबात पालकांचे स्नेह व सहकार्य मिळेल. व्यवसायात कमाई वाढेल. एखाद्या मोठ्या इच्छेची पूर्ती होईल.

सिंह : आजचा दिवस आर्थिक प्रयत्नात यशदायक राहील. राजकीय संपर्क व वाणीची कुशलता फायदा देईल. वडिल व काकापासून कामात किंवा व्यवसायात मदत मिळू शकते. प्रवासाचीही शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होईल. सरकारी क्षेत्रात यश येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात संतुलन राखा.

कन्या : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. तुमचे लग्न व चंद्राचे गोचर दुसऱ्या स्थानात होईल. त्यामुळे व्यवहारिक व संतुलित जीवनशैली जपाल. कार्यकौशल्य व अनुभव आज कामात मिळतील. जवळचे स्नेही लाभ देतील. व्यवसायात वाढ होईल. शिक्षणात नवीन गोष्टी शिकाल. सासरकडून मदत होईल. बुधाच्या उपस्थितीमुळे भाग्य साथ देईल. अनपेक्षितपणे काही काम पूर्ण होईल.

तुळ :दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, पण नंतर तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. मित्र व परिचितांकडून लाभ होईल. मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरीत अधिकाऱ्यांकडून मदत मिळू शकते. संध्याकाळ मनोरंजक राहील. जोडीदार कामात सहकार्य करेल. आवडीचे पदार्थ खायला मिळाल्याने आनंद होईल. 

वृश्चिक : आजचा दिवस तुम्हाला आर्थिक बाबतीत लाभदायक राहील. काम सोपे व सुरळीत चालेल. अडथळा येणारे काम पूर्ण होईल. महत्वाची कामे दिवसभरात पूर्ण करावीत. अचानक खर्च अधिक होऊ शकतो. वाहन अथवा तब्येतीसंदर्भात खर्च येऊ शकतो. जोडीदारा सोबत वाद घालण्याची शक्यता आहे.

धनु : धनु राशींसाठी आजचा दिवस मिश्र राहील. विचार सकारात्मक ठेवा. नोकरीत कामाचा ताण असेल मात्र थोडा संयम बाळगा. प्रयत्नांची फळे निश्चित मिळतील. तब्येतीची काळजी घ्यावी, वाणीवर नियंत्रण हवे. अनवश्यक खर्च टाळावेत. धर्म व कर्माकडे आज जास्त कल असेल. 

मकर :मकर राशींसाठी आजचा दिवस भाग्य वाढवणारा राहील. तुम्हाला प्रामाणिकपणे काम करायला आवडेल. नोकरीत वरिष्ठांची मदत मिळेल. आर्थिक योजना पुढे जतील. फायदेशीर योजनेत सहभागी व्हाल. प्रवासाची शक्यता आहे. विदेशी कामात लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज सुख-संपत्ती मिळतील.

कुंभ : आज व्यवहार करताना सावध राहा. कोणत्याही लालच मध्ये येऊन चुकीच्या संधी घेणे टाळावे. जबाबदारीने कामात वागा. नोकरीत संयम बाळगा. संध्याकाळ पर्यंत तुमची कामं हलकी होतील. अनुभवी व्यक्तीकडून मदत मिळेल. दीर्घकालिक योजनांची वाट पहावी. राजकीय व सरकारी कामात यश मिळेल. ​

मीन :मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. चंद्राचे गोचर तुमच्या राशीच्या सप्तम व अष्टम स्थानांत होईल. त्यामुळे सावधपणे काम करा. इतरांच्या बोलण्यात येऊ नका. आर्थिक व्यवहारात सावध राहा. भागीदारांशी जुळवाजुळव करा, नाहीतर वाद होऊ शकतो. खर्चावर लक्ष द्या. तब्येतीची काळजी घ्यावी.

इतर बातम्या
Join Whatsapp Group