लग्नाची लगबग सुरू असताना अचानक आलेल्या एका निर्णयाने एका कुटुंबात खळबळ निर्माण केली आहे. बीडमधील शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावात PSI नवरदेवाने ऐनवेळी लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला असून, यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वाद निर्माण झाला.भयंकर प्रकार महाराष्ट्रातील बीड येथे घडला.
नवरदेवाने सोनं, कपड्यांसह 14 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. इतकेच नाही, तर वस्तूंच्या देवाणघेवाणीवरूनही दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वादविवाद झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस दल सखोल तपास करत आहे.
दरम्यान , लग्न काही दिवसांवर आलेले असताना पीएसआय नवरदेवाने लग्नाला नकार दिला. या नकारानंतर एकच खळबळ उडाली. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी या लहान गावातील हा प्रकार समोर येताच सगळ्यांना धक्का बसला.