Airtel ने आता त्यांचा गिऱ्हाकांसाठी एक भन्नाट प्लॅन आणला आहे. त्यामुळे वापरकर्त्यांसाठी ही एक खुशखबरच आहे. Airtel ने ₹699 किंमतीचा एक नवीन पोस्टपेड प्लॅन सादर केला आहे, जो सध्या चर्चेत आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे एका रिचार्जमध्ये दोन सिम कार्डचा वापर करण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे कुटुंबातील किंवा दोन युजर्सना एकाच प्लॅनचा फायदा घेता येतो. या ऑफरमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि भरपूर डेटा वापराची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे वेगळा डेटा पॅक घेण्याची गरज राहत नाही.
तसेच, एयरटेलच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये रोज 100 SMS चा फायदा मिळतो. यासोबतच यूझर्सला Amazon Prime चा एक वर्षांचा सब्सक्रिप्शनही दिला जातो. यासोबतच Jio Hotstar Mobile चाही एक वर्षांचा अॅक्सेस मिळतो.या प्लॅनमध्ये Google One सर्व्हिसचाही समावेश आहे. याच्या माध्यमातून यूझर्सला 100GB क्लाउड स्टोरेज मिळतं. यात फोटो, व्हिडिओ आणि आवश्यक फाइल्स ऑनलाइन सुरक्षित ठेवल्या जाऊ शकतात.एयरटेलच्या 699 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये Adobe Express Premium चा सब्सक्रिप्शनही दिलं गेलंय. याच्या मदतीने यूझर्स सहज फोटो एडिटिंग, डिझाइन आणि कंटेंट क्रिकेशनसारखे कामं करू शकतात.