पेट्रोल डिझेल आणि आता सीएनजी महागले ! काय आहेत दर आजचे दर ?
पेट्रोल डिझेल आणि आता सीएनजी महागले ! काय आहेत दर आजचे दर ?
img
Nandini khandare More

 
इराण अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन दर गगनाला भिडले असून अजूनही जनतेला दिलासा मिळण्याचे चिन्ह नाहीत. कारण आता पेट्रोल डिझेल सोबत 
आज सीएनजीच्या दरातही मोठी वाढ करण्यात आली. थेट दणका पुन्हा एकदा लोकांना बसलाय. आज 26 मे2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती वाढ किंवा घट झाली आहे, याबाबत चला जाणून घेऊयात. कालच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली. आज CNG च्या किंमतीत वाढ झाली. दिल्लीत सीएनजीची किंमत दोन रुपयांनी वाढली. दिल्लीत आता सीएनजीची किंमत 83.09 रुपये प्रति किलोवर पोहचल्या आहेत.

आज मुंबईमध्ये 111.21.पेट्रोल तर डिझेल 95.20 प्रति लीटर आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 102.12 तर डिझेल 95.20 रूपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 113.51 तर डिझेल 99.82 प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये 107 पेट्रोल तर डिझेल 99.66 आहे. पटना येथे पेट्रोल 113.35 तर डिझेल 99.36 प्रति लीटर आहे. गाझियाबाद येथे पेट्रोल 101.80 आहे तर डिझेल 94.90 आहे. हैद्राबाद येथे पेट्रोल 115.69 तर डिझेल 103.82 आहे. बेंगलुरू येथे पेट्रोल 102 तर डिझेल 90.99 रूपये प्रति लीटर आहे.

चार वर्षानंतर मे महिन्याच्या 15 मे 2026 रोजी पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या 3 रूपयांनी वाढले. त्यानंतर पुन्हा 19 मे 2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये 90 पैशांनी वाढ करण्यात आली. 23 मे 2026 रोजी तिसऱ्यांदात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ 87 पैशांनी झाली. काल 25 मे 2026 रोजी पेट्रोलच्या किमतीमध्ये 2.61 रूपये प्रति लीटर तर डिझेलच्या किमतीमध्ये 2.71 रूपयांनी वाढ झाली.होर्मुज खाडी बंद असल्याने पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा बघायला मिळत आहे. त्यामध्येच सरकारकडून निर्णय घेत किमतीमध्येही मोठी वाढ केली जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group