बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिस यंत्रणा अलर्ट! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विशेष सूचना
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिस यंत्रणा अलर्ट! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विशेष सूचना
img
Nandini khandare More

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आता एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला विशेष सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. संभाव्य अवैध गोवंश वाहतूक आणि गोवंश हत्येच्या घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, असे आदेश त्यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रातून दिले आहेत.

मालेगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, सातारा, धाराशिव, धुळे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होण्याची शक्यता अधिक आहे, त्यामुळे बकरी ईद काळात या शहरांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कुठेही गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आवश्यक त्या उपाययोजना करा, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तसेच  गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन करा, गोरक्षकांवर हल्ले होता कामा नये, याची खबरदारी घ्या, असंही नार्वेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर  मालेगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, सातारा, धाराशिव, धुळे, सोलापूर या शहरांवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group