नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयची आणखी एक मोठी कारवाई !  डॉक्टरला अटक, नक्की कोण आहे ?
नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयची आणखी एक मोठी कारवाई ! डॉक्टरला अटक, नक्की कोण आहे ?
img
Nandini khandare More



नीट पेपरफुटी प्रकरणात अनेक मोठे खुलासे होत असून आता  सीबीआयकडून  एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीाआयने पुण्यातून आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. डॉक्टर मनोज शिरुरे असं त्याचं नाव आहे, बालरोगतज्ज्ञ असलेल्या शिरूरेने स्वतःच्या मुलासाठी शिवराज मोटेगावकरकडूनपेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सीबीआयने त्याला अटक केली आहे.

 प्रकरणाच्या तपासादरम्यान मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका तसेच संशयास्पद माहिती आढळल्यानंतर सीबीआयने पुण्यात संशयिता विद्यार्थ्यांच्या घरांवर धाड टाकली होती. याच दरम्यान, काल रात्री उशीरा लातूरमध्येही कारवाई करण्यात आली, त्यामध्ये डॉ. शिरुरे याला बेड्या ठोकण्यात आल्या. प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे हे शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.  याप्रकरणाला आता गडद वळण लागलं आहे.

डॉ. शिरुरे हा लातूरमधील असून तो बालरोगतज्ज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे. मनोज शिरुरे याने स्वतःच्या मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असताना सीबीआयने मनोज शिरुरे याला चौकशीसाठी लातूर येथून पुण्यला आणलं होतं. त्याची कसून चौकशी करण्यात आली, त्यानंतर काल रात्री मनोज शिरुरेला सीबीआयने अटक केली. याप्रकरणात एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाला झालेली अटक अशी ही आत्तपार्यंतची पहिलीच कारवाई आहे. त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरण आणखी गंभीर होताना दिसत आहे.

डॉ. शिरुरे याने नेमका कोणाकडून पेपर विकत घेतला आणि तो पुढे कोणाला दिला होता का ? याचा तपासही सीबीआयकडून करण्यात येणार आहे. मंगळवारपासूनच सीबीायकडून डॉ. शिरूरे याची चौकशी सुरू होती, अखेर त्याला काल रात्री अटक करण्यात आली. आता त्याला पुढील तपासासाठी दिल्लीत नेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group